बुधवार, ४ एप्रिल, २०१८

आज गडाच्या सौंदाना येथील ६६ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताहची जिल्ह्यातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी दखल घेतली


श्री क्षेञ नारायणगड संस्थानचा नारळी अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे  वारकरी सांप्रदायाचा कुंभमेळाच आहे.अध्यात्मात गड ही संकल्पना पहिल्यांदा नारायणगडाने आणली म्हणून नारायणगड हा गडांची माऊली आहे. मराठवाड्यातील ८०% कीर्तनकार नारायगडाने दिले. आज गडाच्या सौंदाना येथील ६६ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताहची जिल्ह्यातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी दखल घेतली श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या वतीने सर्वांचे जाहीर आभार .
गडाच्या अधिकृत माहितीसाठी व जास्तीतजास्त प्रसार व्हावा यासाठी खालील लिंक ला भेटद्या व share करा 









रामराव ढोक महाराज यांनी सौंदाना येथील अखंड हरिनाम नारळी सप्ताहातील कीर्तन

रामराव ढोक महाराज यांनी सौंदाना येथील अखंड हरिनाम नारळी सप्ताहातील कीर्तनात आई-वडील यांना सांभाळा, चोरी करू नका, खोटे बोलू नका, व्यवसाय करा, निर्व्यसनी जीवन जगा, वृक्षारोपण करा, मुलींच्या जन्माचे स्वागत करा आणि जेवताना शेतकऱ्यांना आणि झोपतांना लष्करांना विसरू नका असे मौलिक संदेश दिले. या कीर्तनप्रसंगी जिल्ह्यातून हजारो भाविक उपस्थित होते.


मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली

 श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली

श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी आज मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पालकमंत्री, विश्वस्त, महंत व आ. मेटेंच्या उपस्तिथीमध्ये महत्वपूर्ण बैठक होत नारायणगडासाठी तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे .
श्र क्षेत्र नारायणगड च्या 400 एकर वरील प्रस्तावित आराखड्यात कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था, सुलभ शौचालय, सुसज्ज असे वाहनतळ व बस स्थानक, भक्त निवास, सौरऊर्जा यंत्रणा, सांस्कृतिक सभागृह, प्रसादालय, गोशाळा आदी बाबींचा जाणीवपूर्वक समावेश केला आहे.
          गडाची नैसर्गिक शोभा वाढविण्यासाठी वन विभागा मार्फत साधारणपणे 2 कोटी रुपये वन उद्यान उभारण्यात येणार असून, गडावरील घन कचरा आणि पाणी निचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेण्यात येणार असून त्याच बरोबर जलसंधारण विभागा मार्फत पाणी अडविण्यासाठीचे काम केले जाणार आहे.या निधीमधून नारायणगड संस्थानचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून या महत्वपूर्ण बैठकीस कलेक्टर व सी.ओ हेही उपस्थित होते 
.

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

महाराष्ट्रातील तमाम भाविकांना विनंती आहे कि धाकट्या पंढरीच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी प्रचंड संखेने उपस्थित रहावे



गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५


श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ (मुंबई )आयोजीत अखंड हरीनाम साप्ताहाला काल पासून सुरुवात झाली मुंबई तील मराठवाडा परिसरातील व गावाकडील सर्व भाविकांना विनंती आहे कि त्यांनी एक दिवस तरी सप्ताहा ला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.




श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ आयोजीत अखंड हरीनाम साप्ताह ची काल सुंदर सुरुवात झाली पाहिल्या दिवशी जेष्ठ पत्रकार ,संवेनदशील कवी , साहित्यिक ,विचारवंत तथा कीर्तनकार व महाराष्ट्र अत्यंत गाजलेल्या "अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात आडलं" या कवितेचे लेखक बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी त्याचे सहकारी व दैनिक पुढारी चे राजकीय उपसंपादक , प्रशिद्ध उद्योजक घुले साहेब व सोनावणे साहेब यांनी आज भेट दिली . मंडळाच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. शामसुंदर सोन्नर महाराजांनी मंडळाला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच भेट दिल्याबद्दल नारायणगड सेवा भावी संस्था आभारी आहे.

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर (मुंबई ) शहरात भव्य अखंड हरीनाम साप्ताह चे आयोजन

बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर (मुंबई ) शहरात भव्य अखंड हरीनाम साप्ताह चे आयोजन १२/११/१५ ते १९/११/१५ या कालावधीत केले आहे तरी सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण आहे . विशेष म्हणजे मंडळाचे हे १२ वे वर्ष असल्याने  तपपुर्ती सोहळा साजरा होणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व भाविकांना विनंती आहे कि सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कार्यक्रमाला येण्यासाठी पत्ता किंवा रस्ता संदर्भात  मदत हवी असल्यास ९३२०००३४९१ या मोबाईल वर संपर्क करावा .


बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

पाण्यात आणि मनात काय साम्य ?

पाण्यात आणि मनात काय साम्य ?

दोन्ही जर गढूळ असतील तर..
अत्यंत धोकादायक
दोघही आयुष्य संपवू शकतात.
दोन्ही जर उथळ असतील तर
खळखळाटच फार...
पाय घसरण्याची शक्यता अधिक.

दोन्ही स्वछ असतील तर जिथे
जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
पाण्यात आणि मनात मुख्य फरक काय ?
पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" होते अन...
मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो ...!!...💐💐