शुक्रवार, १८ मार्च, २०१६

महाराष्ट्रातील तमाम भाविकांना विनंती आहे कि धाकट्या पंढरीच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी प्रचंड संखेने उपस्थित रहावे



गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५


श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ (मुंबई )आयोजीत अखंड हरीनाम साप्ताहाला काल पासून सुरुवात झाली मुंबई तील मराठवाडा परिसरातील व गावाकडील सर्व भाविकांना विनंती आहे कि त्यांनी एक दिवस तरी सप्ताहा ला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.




श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ आयोजीत अखंड हरीनाम साप्ताह ची काल सुंदर सुरुवात झाली पाहिल्या दिवशी जेष्ठ पत्रकार ,संवेनदशील कवी , साहित्यिक ,विचारवंत तथा कीर्तनकार व महाराष्ट्र अत्यंत गाजलेल्या "अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात आडलं" या कवितेचे लेखक बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी त्याचे सहकारी व दैनिक पुढारी चे राजकीय उपसंपादक , प्रशिद्ध उद्योजक घुले साहेब व सोनावणे साहेब यांनी आज भेट दिली . मंडळाच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. शामसुंदर सोन्नर महाराजांनी मंडळाला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच भेट दिल्याबद्दल नारायणगड सेवा भावी संस्था आभारी आहे.

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर (मुंबई ) शहरात भव्य अखंड हरीनाम साप्ताह चे आयोजन

बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर (मुंबई ) शहरात भव्य अखंड हरीनाम साप्ताह चे आयोजन १२/११/१५ ते १९/११/१५ या कालावधीत केले आहे तरी सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण आहे . विशेष म्हणजे मंडळाचे हे १२ वे वर्ष असल्याने  तपपुर्ती सोहळा साजरा होणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व भाविकांना विनंती आहे कि सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कार्यक्रमाला येण्यासाठी पत्ता किंवा रस्ता संदर्भात  मदत हवी असल्यास ९३२०००३४९१ या मोबाईल वर संपर्क करावा .


बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

पाण्यात आणि मनात काय साम्य ?

पाण्यात आणि मनात काय साम्य ?

दोन्ही जर गढूळ असतील तर..
अत्यंत धोकादायक
दोघही आयुष्य संपवू शकतात.
दोन्ही जर उथळ असतील तर
खळखळाटच फार...
पाय घसरण्याची शक्यता अधिक.

दोन्ही स्वछ असतील तर जिथे
जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
पाण्यात आणि मनात मुख्य फरक काय ?
पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" होते अन...
मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो ...!!...💐💐

शुक्रवार, २६ जून, २०१५

क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती.सात्यकी पहारा करू लागला
तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.
एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.
पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
👉क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारातच वसत असते.

मंगळवार, ५ मे, २०१५

संकटांपासून कधीच पळून चालणार नाही.

संकटांपासून कधीच पळून चालणार नाही.

कदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. 

एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल पण माझ्या मते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही.''

देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. 

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे इतके पीक आले होते.

शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते तो वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या त्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही."

" सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हान मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

कथासार - जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्याच्यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटाकडूनच माणूस शिकतो. 

जीवनात जर कधी यशस्वी व्हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्यानेच संकटे दूर होतात त्याच्यापासून दूर पळून नाहीत.

Sources : कुठेतरी छानसे वाचलेले.


मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.

क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.
एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.
पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’
Sources : WhatsApp