सोमवार, १ डिसेंबर, २०१४

चांगलीच विचारधारा

चांगलीच विचारधारा
जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही. .......
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........
सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही......
समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......
मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......
आपली माणस कोण ते संकटांशिवाय कळत नाही ........
सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......
जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....
काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......
मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......
चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.


माउली नंतर समाधी नाही ||
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ||
शिवराया नंतर छत्रपती नाही||
गंधर्वा नंतर गाणं नाही |
माशा नंतर पोहण नाही |
रामानंतर आचरण नाही |
रावणानंतर श्रीमंती नाही |
गरुडानंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
देवा नंतर आशिर्वाद नाही |
आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर (मनुष्य) देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणि......
जीवन जगताना हे मी कधीच विसरत नाही,
म्हणून चांगल वागता आलं नाही तरी चालेल पण;
जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा