सोमवार, १ डिसेंबर, २०१४

एक छान गोष्ट



एक छान गोष्ट
एक दहावीत असलेला मुलगा मधल्या सुट्टीत डबा खात असतो त्याचे मित्र पण डबा खात असतात. सर्वांचा डबा खाऊन होतो पण तो मुलगा डबा अगदी चाटून पुसून खात असतो सगळे जण त्याची चेष्टा करतात.
त्यांतला एक त्याला विचारतो एवढं का चाटून पुसून खात आहेस? मुलगा शांतपणे उत्तर देतो.
हे माझं असं अन्नाचा प्रत्येक कणं पुसून खाणं हे मी माझ्या आई बद्दल व्यक्त केलेला आदर आहे की जी सकाळी लवकर उठून माझ्यासाठी आवडीने बनवते आणी तेही दररोज, तसेच हा आदर त्या बाबांसाठी ही आहे ते दिवसरात्र मेहनत करून त्या अन्ना साठी लागणारा पैसा कमावतात.
आपण अन्नाची केलेली नासाडी हा आई बाबांच्या मेहनतीचा अपमान तर आहेच पण त्याही पेक्षा जास्त तो त्या शेतकरी बांधवाचा आहे जो ते दिवसरात्र खपून पिकवतो.
स्वत: अंमलबजावणी करा कुणाला पाठवले नाही तरी चालेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा