मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.

क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.
एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.
पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’
Sources : WhatsApp

शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

प्रारब्धाचा हिशेब

प्रारब्धाचा हिशेब  :

एक दिवस एक माणूस पूर्व सुचना देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना देता गैरहजर राहीला ...
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
त्याने कुठलीही तक्रार करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..
''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........

तात्पर्य -

जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
''खूप सुंदर नाते आहे माझ्यात देवामध्ये ....''
''जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही .......

बेलाशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती देवाची कृपा होती.


बुधवार, २२ एप्रिल, २०१५

|| एक दिवसाचा पांडुरंग ||

|| एक दिवसाचा पांडुरंग ||

पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता,
तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील..!
म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले,
देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस,
तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे,
मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे ,
पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस,
काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा.
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊं दे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला.
पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले.
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच
मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे...!
देवा माझी बायको मुले दिवसांपासून उपाशी आहेत,घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल, असा मला विश्वास आहे.
असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणून तो ते पाकीट घेऊन जातो आपल्या उपाशी बायकोला, मुलांना इतर गरीब लोकांना अन्न देतो.
गोकुळ काहीच बोलता हसत उभाच असतो.
पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे..!
असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात
तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो.
तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू
शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो.
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा...?
हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वत:हा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने
काहीतरी केले असते,
असे म्हणून राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... !
त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.
रात्री पांडुरंग मंदिरात येतो गोकुळाला विचारतो कसा होता दिवस....?
गोकुळ म्हणतो ,पांडुरंगा मला वाटले होते, कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते...!
ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात..!
पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू
माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही.!
तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही..?
गोकुळ मान खाली घालून उभा राहतो..!
पांडुरंग पुढे म्हणतो,
अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे
चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये
माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट
हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.
आणि त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत,
ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक
करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेसआणि नेहमी जे होते तेच आजपण झालेदेव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो,
पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो.....!
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे, फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे..!


                                                      ||  श्री हरी विठ्ठल विठ्ठल  ||


शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

माघार घेऊ नकोस …

माघार घेऊ नकोस …
जेव्हा तुला अनंत अडचणी येतील
जेव्हा तुझा मार्ग अत्यंत खडतर असेल
जेव्हा तुझ्या अपेक्षा जास्त असतील 
व तुला पाहिजे तसे यश मिळत नसेल
जेव्हा तुला हसायचे असेल, परंतु रडावे लागत असेल
जेव्हा तुला चिंतेने ग्रासलेले असेल …
तेव्हा तू थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस.
जीवन चढ उतारांनी भरलेले आहे.
जेव्हा तू काही मिळविण्यासाठी परिश्रम करत असशील
तेव्हा कधी कधी अपयशही येईल .
पण तू प्रयत्न करणे सोडलेच नाहीस तर तुझा विजय निश्चित आहे.
आता जरी तुला तुझी प्रगती कमी वाटली तरी,
तू पुढच्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकतोस
अपयश ही यशाची दुसरी बाजू आहे.
जेव्हा मनातल्या बऱ्याचशा शंकामुळे आपल्याला
यशाची शक्यता कमी दिसते …
तेव्हा, यशापासून आपण नेमके किती दूर आहोत,
हे आपण खरेच सांगू शकत नाही.
यश खूप दूर आहे असे जेव्हा आपल्याला वाटते
तेव्हा ते खूप जवळही असू शकते .
जेव्हा तू प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असशील
तेव्हा, खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस
प्रयत्नांनी तुला थकवा येईल
तेव्हा थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस
अजिबातच माघार घेऊ नकोस …
येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी सज्ज रहा
त्यांना खंबीर मानाने सामोरे जा.
(Sources : कुठेतरी छानसे वाचलेले.)

सुविचार 'यशाचे'

सुविचार 'यशाचे'
जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमची यशासाठीची तळमळ अपयशाच्या भीतीपेक्षा कित्येक पटीनं जास्त हवी.
-- बिल कॉस्बी, अभिनेते, लेखक
ज्यांच्यात प्रचंड अपयश पचवण्याची धमक असते, तेच भव्यदिव्य यश संपादन करू शकतात.
-- रॉबर्ट एफ. केनेडी, राजकीय नेते
यश संपादन करताना काय काय गोष्टी तुम्ही गमावून बसलात, काय काय गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागल्या, याचा विचार करा आणि त्यावरच यशाचं मोजमाप करा.
-- दलाई लामा, तिबेटी धर्मगुरू
कधीच चुका न करणं म्हणजे यश नाही; तर एकच चूक दुसऱ्यांदा न करणं ही गोष्टच तुम्हाला यशप्राप्तीकडे घेऊन जात असते.
-- जॉर्ज बर्नार्ड शॉ, प्रसिद्ध नाटककार
अपयश? छे! मी कधीच अपयशी ठरत नाही. माझ्या अवतीभवतीचे लोक माझ्यापेक्षा जरा जास्ती यशस्वी ठरतात, इतकंच!
-- कॅरोल ब्रायन (प्राध्यापक, लेखिका)
आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या! एक म्हणजे दुर्लक्ष करायला शिकणं आणि दुसरी आत्मविश्वास बाळगणं. एवढं जमलं की मग यश निश्चित!
-- मार्क ट्वेन, प्रसिद्ध लेखक
यशस्वी व्यक्ती कोणती? तर जिच्यावर समाजाने फेकलेल्या टीकेच्या दगडविटांतूनच एक पक्का, भक्कम पाया जिला बनवता येतो ती व्यक्ती!
-- डेव्हिड ब्रिन्कले, पत्रकार
यश हा एक प्रवास आहे. ते केवळ अंतिम ठिकाण किंवा साध्य नव्हे.
-- बेन स्वीटलँड, लेखक
एखादी व्यक्ती आयुष्यात कोणत्या पदावर जाऊन बसली किंवा तिनं काय मिळवलं यावर तिचं यश मोजू नये, हे मी शिकलोय. यश मिळवण्यासाठी तिने जे प्रयत्न केले, ते करताना तिला कोणत्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं, ते कसे दूर केले यावर तिचं यश मोजलं जावं.
-- बुकर टी. वाँशिग्टन, प्रसिद्ध लेखक, वक्ता व नेता
जर योग्य मानसिक दृष्टिकोन असेल तर अंतिम साध्य गाठण्यास, यशस्वी होण्यास माणसाला कोणीही अडवूच शकणार नाही. तो यश मिळवणारच. पण मानसिक दृष्टिकोनच जर चुकीचा असेल तर त्याला कोणी यश मिळवूनही देऊ शकणार नाही हे निश्चित!
-- थॉमस जेफर्सन, अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष
अपयशामागून अपयशाचा सामना करत तेवढय़ाच उत्साहाने सतत वाटचाल करत राहणं हाच यशप्राप्तीचा मार्ग असतो.
-- विन्स्टन चíचल, ब्रिटनचे माजी पंतप्रधान
अपयशातूनच यशाचा मार्ग चालत राहा. मनोधर्य खच्ची होणं आणि अपयश हे दोन्ही यशाचे खात्रीशीर 'स्टेपिंग स्टोन्स' आहेत.
-- डेल कान्रेजी, प्रसिद्ध लेखक
प्रत्येक यशाची गुरुकिल्ली एकच! ती म्हणजे कृती करत राहणं.
-- पाब्लो पिकासो, चित्रकार
यश मिळवणं? अगदी सोपी गोष्ट आहे ही! फक्त योग्य वेळी, योग्य प्रकारे योग्य ती कृती करत राहा.
-- अरनॉल्ड ग्लासो, प्रसिद्ध उद्योजक
यश म्हणजे काय? मला वाटतं यश हे अनेक विचारांचं अजब मिश्रण असतं. तुम्ही जे करताय, तेवढंच पुरेसं नाही, तुम्हाला आणखी कष्ट करायला हवेत आणि या सगळ्यात काहीतरी प्रयोजनही नक्की हवं. यश या साऱ्या विचारातून घडत जातं.
-- मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान
तुम्हाला यश मिळवायचं असेल तर यशस्वी होण्याचं अंतिम ध्येय मनाशी बाळगू नका. फक्त तुम्हाला जे करायला आवडतं ते मनापासून करत राहा. त्यावर विश्वास ठेवा. यश आपोआप मिळेलच.
-- नॉर्मन विन्सेन्ट पील, 'पॉझिटिव्ह िथकिंग' विषयक पुस्तकांचे लेखक
सहजसोप्या आणि निवांत पद्धतीने व्यक्तिमत्त्व घडत नसतं. प्रचंड कष्ट, अडचणी, त्रास यातूनच आत्मा कणखर बनत जातो. अविचल दृष्टी लाभते, महत्त्वाकांक्षा फुलतात आणि यश मिळत जातं.
-- हेलन केलर
तुम्हाला अमुक एक गोष्ट चांगली आहे किंवा तमुक गोष्टीवर विश्वास ठेवा असं सांगितलं गेलं, तरी तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला स्वतला जे ठाऊक आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. त्यावर जेव्हा विश्वास ठेवता तेव्हाच तुमचं तुम्ही भव्य स्वप्न साकारण्याच्या मार्गावर पाऊल ठेवता. यशाचा आविष्कार तुमच्या आतूनच होत असतो.
-- राल्फ वाल्डो इमर्सन, लेखक व कवी
आपल्या प्रत्येकाच्या स्वतच्या अशा खास इच्छा असतात. प्रत्येकाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे आणि खास तशाच त्या वेगळ्या असतात. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला काय आवडतं, तुमचं कशावर प्रेम आहे, याचा शोध घेणं. त्यानंतर इतरांना सेवा म्हणून ते उत्तम प्रकारे देऊ करणं, खूप कष्ट करणं आणि या विश्वातल्या ऊर्जेच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करणं.
-- ऑप्रा विन फ्रे, टीव्ही शो अ‍ॅन्कर, सामाजिक कार्यकर्त्यां
सामान्य गोष्टी असामान्य पद्धतीने उत्तम करणं हेच यशप्राप्तीचं गुपित आहे.
-- जॉन डी. रॉकफलेर, प्रसिद्ध उद्योगपती व विचारवंत
अपार कष्ट आपल्या कामाप्रती अविचल निष्ठा आणि आपण जिंकू किंवा अपयशी ठरू याची तमा न बाळगता आपल्या कामात १०० टक्के झोकून देण्याचा, पूर्ण शक्ती लावून ते काम करण्याचा निश्चय या गोष्टीतूनच यश साकारत जातं. म्हणूनच यशस्वी व्यक्ती आणि इतरांच्यातला फरक काय? इतरांकडे क्षमता नसतात, ताकद नसते किंवा ज्ञान नसते असं नाही. पण यशस्वी व्यक्तींमध्ये जी आंतरिक तळमळ आणि इच्छा असते, त्याची कमी इतरांमध्ये असते.
-- विन्सेट (विन्सी) लोम्बार्डी, ख्यातनाम फूटबॉलपटू
यशाची 'रेसिपी': नम्रता अंगी असावी, जे काम तुमच्यावर सोपवलंय, ते पार पाडण्याची मानसिक तयारी असावी, उत्साही व व्यवस्थित राहावं. कधीही कुणाबद्दल द्वेषभावना नसावी, नेहमी प्रामाणिक राहा. तरच तुम्ही इतरांशी प्रामाणिकपणे वागू शकाल, इतरांच्या मदतीला तत्पर राहा, स्वतच्या कामात रस घ्या, कधी स्वतला इतरांच्या नजरेत दयनीय बनवू नका, इतरांची स्तुती करण्यात तत्परता दाखवा. मत्रीत निष्ठा असू द्या, पूर्वग्रह झटकून टाका, स्वतंत्र वृत्ती अंगी बाणवा..
-- बनॉर्ड बॅरूच, अर्थतज्ज्ञ व राजकीय सल्लागार
* समाजाला हितकारक ठरतील अशा कृती करणं आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेणं म्हणजे यश! यावर तुमचा विश्वास असेल, अन् ही व्याख्या तुम्ही मनापासून स्वीकारत असाल, तर 'यश' तुमचंच आहे.
-- केली किम
Sources : WhatsApp Msg

समाधान

समाधान
एकदा एक माणूस एका मंदीरात गेला.... त्याने पाहीले
एक मुर्तीकार एका देवतेची मुर्ती घडवत होता....
तो जी मुर्ती घडवत होता अगदी तशीच हुबेहुब अजुन एक मुर्ती
बाजुला पुर्ण झालेली होती... त्या माणसाला कुतुहुल वाटले
त्याने मुर्तीकाराला विचारले.
" तुझ्या कडे एक मुर्ती तयार असताना परत तु हुबेहुब अशीच दुसरी
मुर्ती का घडवत आहे. इथे दोन मुर्ती स्थापन करणार आहात का ?"
" नाही " त्याचाकडे न पाहताच मुर्तीकार म्हणाला , " एकचं मुर्ती
स्थापणार आहे पण हा पहीली मुर्ती बनवताना चुकली आहे "
त्या माणसाने त्या अप्रतीम मुर्तीचे चहुबाजूने निरिक्षण केले
त्याला त्यात काहीच चुकलेले दिसले नाही .
" ही मुर्ती तर अप्रतीम आहे यात तर काहीचं चुकलेले दिसत नाही "
" त्या मुर्तीच्या नाका जवळ एक बारीक ओरखडा जास्त झाला आहे "
मुर्तीकार बोलला अजुनही तो त्याच्या कामात गुंग होता.
"ही मुर्ती तुम्ही कुठे स्थापणार आहात ?" तो माणूस
" या समोरच्या खांबाच्यावर जवळपास जमीनी पासून २५ फूट उंच" मुर्तीकार
" जर तो इतक्या तो इतक्या वर असणार आहे तर मग कोणालाच
समजणार नाही की मुर्तीच्या नाकाला एक ओरखडा जास्त आहे " तो माणूस
तो मुर्तीकाराने त्याचे काम थांबवले, त्या माणसाकडे निरखून पाहीले ,
मग एकदम दिल खुलास हसला आणि म्हणाला .
" कोणाला समजले नाही तरी माला तर माहीत आहे ना "
कोणतेही कामाचे मुल्यमापण करताना ते काम केल्याचे आपणाला
समाधान नसेल तर मग दुसर्‍याने त्या कामाची कितीही प्रशंसा केली
तरी त्याचा काही उपयोग नसतो....
Sources : Unknown

इतरांचं कायम ऐकत बसलात तर..

इतरांचं कायम ऐकत बसलात तर...
एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय कमी आहे की, आपण या भल्यामोठय़ा टॉवरवर चढू शकत नाही. सतत काय डबक्यात रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ.
सगळे बेडूक ठरवतात की शर्यत लावायची.
माणसांना, इतर प्राण्यांना ही बातमी समजते. तुफान गर्दी जमते.
लोक हसतात. पाली चिडवतात. इतकंच काय उंदीर, घुशी, नाकतोडे, गांडूळंसुद्धा म्हणतात की, डबकं सोडून जाऊ नका, तुमच्यानं काहीच होणार नाही. उगंच पडाल, फुकट मराल.
पण बेडूक काही ऐकत नाहीत.
स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून सतत कानावर आवाज. ‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’
तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात.
टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल.
एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात. रडतात. हरतात.
एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो.
वर जाऊन पाहतो.
ते विहंगम दृश्य पाहून खूश होतो.
लोकं टाळ्या वाजवतात. इतर प्राणीही अवाक् होतात.
हे घडलं कसं?
तो बेडूक खाली उतरतो.
सगळे त्याला विचारतात, तुला हे कसं जमलं? इतका विरोध? इतकी टवाळी?
तरी तू डबकं कसं काय सोडलंस?
तो बेडूक काहीच बोलत नाही.
तेवढय़ात एक म्हातारा बेडूक येतो. म्हणतो, तो जन्मत:च कर्णबधिर आहे. त्याला ऐकूच येत नाही.
सगळे गप्प होतात..
त्यावर तो म्हातारा बेडूक बाकीच्या बेडकांना म्हणतो, टॉवरवर चढण्याची आस आणि डबकं सोडण्याची इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला चिडवतात, हरवतात, नाउमेद करतात तेव्हा चालत राहण्याचं बळ हवं.
इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल?
Sources : Unknown

शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात.

शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात.
एका राजाजवळ खादाड बकरा होता. राजाने दवंडी दिली, बकऱ्याला जंगलात चरायला नेऊन तृप्त करून आणेल, त्याला अर्धे राज्य बक्षीस. पण बकरा तृप्त झाल्याची परीक्षा मी घेईल. काम खूप सोपे वाटून एकजण धावत राजाकडे आला. बकरा घेऊन जंगलात गेला. दिवसभर कोवळे हिरवेगार गवत चरायला दिले. संध्याकाळी त्याला वाटले, दिवसभर बकरा चरतोय, नक्कीच त्याचे पोट भरले असणार. बकऱ्याला घेऊन राजाकडे आला. राजाने हिरवे गवत टाकल्याबरोबर बकरा खाऊ लागला. राजा म्हणाला, याला पोटभर खाऊघातले नाहीस. अन्यथा त्याने गवत खाल्ले नसते.
नंतरही पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले. एका सुविचारी माणसाला वाटले, राजाच्या दवंडीत रहस्य आहे. काम युक्तीने केले पाहिजे. त्याने बकरा जंगलात नेला. बकऱ्याने गवत खायला सुरूवात केली की, तो बकऱ्याला काठीने मारीत असे. दिवसभर असे घडल्याने बकऱ्याची मानसिकता अशी झाली की, गवताला तोंड लावले की मार मिळतो. संध्याकाळी सुविचारी मनुष्य बकऱ्यासह दरबारात आला. राजाने गवत टाकले. बकरा त्याकडे पहायला तयार होईना. कारण गवत खाल्ले की मार बसण्याची भीती!
आपले मनही असेच आहे, तृप्त न होणारे. त्याचे विवेकाने ताडन केले तरच ते ताब्यात राहील. अन्यथा, अहंकाराचा चारा त्याला पुष्ट करील. अहंकार दूर झाला की अंत:करण शुद्ध होते. शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात. विश्वाला प्रगतीच्या दिशेने नेतात....!!!
Sources : WhatsApp