रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

मूर्ख, अडाणी माणसाला हितकारक सल्ला किंवा उपदेश रुचत नाही

 
 
 
तुकाराम महाराज म्हणतात
गाढवाच्या अंगाला चंदनाची उटी लावली तरी राखेत लोळून
तो ती सर्व पुसून टाकतो, तसेच माकडाच्या गळ्यात जर
मोत्याचा हार घातला तर तो ते चावून, त्याची विलेवाट लावून
थुंकून टाकतो. ते म्हणतात ज्याच्या अंगी जे स्वाभाविक गुण
असतात म्हणजेच ज्याचा जो स्वभाव असतो त्यात बदल
घडवून आणणे अशक्य असते, तो ते गुण सोडू शकत
नाही किंवा त्यात बदल करत नाही.
तुकोबाराय म्हणतात मूर्ख, अडाणी माणसाला हितकारक
सल्ला किंवा उपदेश रुचत नाही, ते तो झिडकारून
लावतो आणि त्यात स्वतःची मते घालून व त्यानुसार वागून
स्वतःच्या अज्ञानात अजून भर घालतो.
===================================
गाढवाचे अंगी चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणे ।।
सहज गुण जयाचिये देही । पालट ते (तो) काही नव्हे तया ।।
माकडाचे गळा मोलाचा तो मणि ।
घातला चावुनि थुंकोनि टाकी ।।
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुले मते ।।
===================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा