मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

पहारा चालु आहे

पहारा चालु आहे
एका नगरातील राजा व त्याची राणी दोघेही फार धार्मीक
वृतीचे होते.राणीला देवीच्या पुजेसाठी दररोज फुले
लागत,कधी कधी फुले न मिळाल्याने तीची पुजा परिपुर्ण होत
नसे व तीला उपवास घडत असे.त्यामुळे तीने फुलांची बाग
तयार करुन रक्षणासाठी दोन
पहारेकरी ठेवले.तीचा पुजेचा नित्यक्रम सुरु
झाला.काही काळानंतर मुलाचे ताब्यात राज्य कारभार
दिला राजा व राणी तीर्थयात्रेला गेले व .दुदैवाने
राजाराणी परत केंव्हाच आली नाही.असा बराच काळ गेला व
राज्यात दुष्काळाचे सावट आले.त्यामुळे तिजोरीवर आर्थीक
ताण वाढू लागला.खर्चात कपात करण्यात
आली.प्रधानाला प्रत्येक खात्याबाबत अनावश्यक खर्च
कोठे कोठे आहे याची चौकशी करण्याचे आदेश
दिले.चौकशीअंती दोन पहारेकरी मोकळया जागेवर
पहारा करताना आढळले.त्या पहारेक-
याच्यांबाबातचा अहवाल राजाकडे आला तो अहवाल
तपासला व प्रत्यक्ष चौकशी केली तर
ज्या ठिकाणी पहारा होता त्या ठिकाणी राणीने पुजेला फुले
उपलब्ध व्हावीत म्हणून फुलांची बाग लावली. त्या बागेत
फुलांची वेल होती ती पहारेक-यांच्या पायात अडकत
असल्याने ती वेल त्यांनी उपटून टाकली व बागही नष्ट झाली,
मात्र पहारा सुरुच होता.
सिध्दांत - आताच्या परिस्थितीत परमार्थ जोरात चालू असून
आळंदी पंढरपूरच्या वा-या, तीर्थयात्रा, वृतवैकल्य, होम
हवन,पूजापाठइत्यादी धार्मीक कर्मे जोरात सुरु आहेत. मात्र
करण्याचे वर्म माहित नसल्याने त्यातील अनुभव येत
नाही.ज्ञानोबा तुकोबांनी लावलेला भक्तीमार्गाचा वेल आज
योग्य पध्दतीने जोपासला न जाता तो उपटून टाकण्याचेच
काम सुरु आहे.इतर साधने कशासाठी याचे वर्म समजावून घेणे
अत्यंत आवश्यक आहे.
प्रमाण - १} अर्थ लोपले पुराणे । नाश केला शब्द ज्ञाने ।
विषय लोभी मने । साधन अवघी बुडवली ॥ संत तुकाराम
महाराज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा