गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

श्री क्षेत्र नारायण गडाचे दर्शन आता एका क्लिकवर.. शिवाजी महाराजांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन

श्री क्षेत्र नारायण गडाचे दर्शन आता एका क्लिकवर
  शिवाजी महाराजांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन
दि . १० नोव्हेंबर २०१४ - धाकटी पंढरी श्री क्षेत्र  नारायण गडाचा नावलौकिक महात्म्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्याची माहिती संपूर्ण जगामध्ये पोहचावी व नवतरुणांना गडाचा ऐतिहासिक वारसा व गडाची वाटचाल कळावी या उद्देशाने श्री क्षेत्र नारायण गडाची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून या वेबसाईटचे  मान्यवराच्या उपस्थीतीमध्ये गडाचे मठाधिपती ह.भ.प श्री  शिवाजी महाराज यांच्या हस्ते आज गडावर उद्घाटन करण्यात आले आहे . श्री नारायणगडाला सुमारे तीनशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा असून अध्यात्मिक व धार्मिक कार्य हाती घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर गडाने भगवी पताका मोठया तोऱ्यामध्ये मिरवली आहे. या गडाच्या विकास कामाला मठाधिपती श्री  शिवाजी महाराज, विश्वस्त मंडळ यांनी गेल्या तीन वर्षापासून मोठी चालना  दिली आहे. गेल्या तीन-साडेतीन वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक विकासकामे मोठया झपाटयाने होत असतांना पाहायला मिळत आहे म्हणूनच कि काय याची दखल घेत प्रसारमाध्यम ही गडाविषयी गुणगान गाऊ लागली आहेत. या गडाची महती आणि ऐतिहासिक वारसा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता त्याचा नावलौकिक अखंड जगतामध्ये व्हावा या उद्देशाने मुंबई येथील Blossom Infotech या  कंपनीने धाकटी पंढरी क्षेत्र नारायणगडाची स्वतंत्र वेबसाईट तयार केली असून www.narayangad.com या वरती एका क्लिकवर संपूर्ण नारायनगडाचे भाविक भक्ताचे  दर्शन करणे सोपे केले आहे. या संकेत स्थळाचे आज गडावर  मठाधिपती  महंत  ह.भ.प शिवाजी महाराज यांच्या हस्ते आज  उद्घाटन करण्यात आले आहे. या वेबसाईटचे निर्मितीसाठी Blossom Infotech या कंपनीचे मालक सुभाष काशिद व संतोष काशिद या  बंधूनी मोठी मेहनत घेवून  श्री क्षेत्र नारायणगडाची इत्यांभूत माहिती संकलीत करून वेबसाईट वर दिली आहे.  फोटोसाठी  उत्कर्ष गवते ,गवते सर , लोंढे सर  यांचे ही  सहकार्य लाभले आहे. या वेबसाईटवरून भाविक भक्ताना गडाची माहिती, गडाचा इतिहास , गडाचे एकून बांधकाम , आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व मठाधिपती ची माहित ,त्यांचे कार्य , गडावरील साजरे होणारे  उत्सव, दैनंदिनी , मुंबई किंवा पुण्याहुन गडावर कसे पोहचत येईल यासाठी रस्ता , रेल्वे , विमान मार्गाची माहिती  उपलब्ध केली आहे. या वेबसाईटचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव ऑड. महादेव तुपे, दिलीप गोरे, प्रा. जनार्धन शेळके, भीमराव मस्के आदी विश्वास्तंसह मधुकर महाराज गवारे, संभाजी महाराज मादळमोहिकर, इंजि, महेश साळुंके, लक्ष्मण महाराज ताकीक, रावसाहेब महाराज ढोणे, राजेंद्र महाराज गवते, नवनाथ काशीद आदींसह मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. दिलीप गोरे व इतर विस्वस्तानी आपल्या भाषणामध्ये  Blossom Infotech या कंपनीचे मालक संतोष काशिद यांचे आभार मानले . श्री संतोष काशिद यानी आपल्या भाषणात वेबसाईट बनवण्यसाठी सहकार्य केल्याबद्दल उत्कर्ष गवते, लोंढे सर , गवते सर ,संस्थानाचे विस्वस्त व मठाधिपती गुरुवर्य श्री शिवाजी महाराज यांचे आभार व्यक्त केले .

आमच्या प्रतिनिधीने श्री संतोष काशिद यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी त्याचे मुळगाव साक्षाळ पिपरी हे असून त्यांना या कामाची प्रेरणा वै. श्री महंत महादेव महाराज हे मुंबई येथे त्याचा घरी मुक्कामी असतानी मिळाल्याचे सांगितले.  नारायणगडा साठी  स्वतंत्र मोबाइल अप्स बनवणार असल्याचे मानोदय त्यांनी व्यक्त केला .               
 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा