शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

जिथे चुकले तिथेच जोडणे



जिथे चुकले तिथेच जोडणे
एका गांवात अत्यंत श्रीमंत वडारी रहाता होता,त्याला एक
मुलगी असून ती त्याची अत्यंत लाडकी होती.ती उपवर
झाली असता तीला वर शोधण्याचे त्यांने ठरवले.जगामध्ये
सर्वांत मोठा वर आपल्या मुलीला मिळावा म्हणून त्याने
भवीष्य सांगणा-याकडे जाऊन युक्ती विचारली पैसे पाहिजे
तेवढे घ्या पण उपाय सांगा.असे म्हटल्यावर भविष्यकाराने
वडा-याला सांगीतले माझे सांगण्याचे काम तुमचे
करण्याचे.जगात सर्वांत मोठा श्रीमंत सुर्य आहे तू
त्याच्याकडे जा, वडा-याने शिडया लावल्या सुर्याकडे
केला सुर्याला म्हणाला मुलीला पदरात घ्या,तुम्ही सर्वात
मोठे आहात.तर सुर्य म्हणाला माझ्यापेक्षाही ढग मोठे
आहेत,ते मला त्यांच्या कर्तुत्वाने झाकूण टाकतात.मग
तो ढगाकडे केला याचना केली मुलीला पदरात घ्या.ढग
म्हणाले माझयापेक्षाही वारा मोठा आहे.कारण
वारा आल्यावर आम्ही कुठल्याकुठे उडून जातो.मग तो वा-
याकडे गेला घ्या पदरात म्हणून
विनंती केली.वारा म्हणाला माझयापेक्षाही दगड मोठे आहेत
कारण कितीही सोसाटयाचा वारा आला तरी ते जागचेही हालत
नाहीत.मग तो दगडाकडे गेला तुम्ही जगात मोठे आहात तर
माझया मुलीला पदरात घ्या म्हणून विनंती केली.त्यावर दगड
म्हणाले वडारी आला तर मी थरथर कापू लागतो कारण
तो हातोडीने माझे तुकडे तुकडे करतो.शेवटी त्याला झक मारून
आपली मुलगी वडा-यालाच दयावी लागली.
सिध्दांत - जिथं चुकलं तिथचं जोडले पाहीजे,अन्यत्र जोडून
त्याचा काहीही उपयोग होत नाही. आमचा देवाचा संबंध
तुटला आहे बेंबींच्या देठाजवळ मात्र
आम्ही तो जोडतो वाचेमध्ये यामुळे देवाची आपली ओळख
केंव्हाच होणार नाही.
प्रमाण - } संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ
जोडीला ..तुकाराम महाराज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा