शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

केलें म्हणजे होतं.

केलें म्हणजे होतं

एक व्यवसायाने वकिल पेशा करणारे जोडप
होत.दोघेही कोर्टातून घरी आल्यानंतर तो म्हणायचा आज
अशी केस जिंकली,तसी केस जिंकली,आज असं झाल, तसं
झालं. परंतु ती म्हणायची,त्यात काय मोठं केलं म्हणजे होंत
आणि रोज रोज अस चालल्यानंतर तो मोठया फुशारकीने
सांगायचा आणि ती म्हणायची, त्यात काय मोठं केल म्हणजे
होंत परंतु त्यामुळे त्याला खुप राग आला व त्याच
टोकाची भांडणे होऊन दोघेही वकील असल्यामुळे वगेच
फारकत घेवून मोकळे झाले. मग साहेब मुंबईला तर बाईसाहेब
नागपूरला. नागपूर येथे एक सर्कस आली होती व
त्या सर्कसीमध्ये एक वकील महीला सल्लागार
हवी होती.बाईसाहेबांनी जाहीरात वाचली व
त्या ठिकाणी सर्कसमध्ये रजू झाल्या.त्या सर्कसमध्ये एक
हत्तीन व्याली होती.बाईसाहेबानी ते एक दिवसाचे पिल्लू
उचलून खांद्यावर घेतल.अशा रीतेने रोज
सकाळ,दुपार,संध्याकाळ ते पिल्लू ती उचलू लागली.ते
पिल्ल्ूा दोन वर्षाचे मोठे झाले.काही दिवसांनी ती सर्कस मुंबई
येथे आली,पोस्टर झळकू लागली की, बाई हत्ती उचलते
आणि हे पोस्टर वकील साहेबाने पाहीले.त्याला आश्चर्य
वाटले मुद्याम फर्स्ट क्लासचं तिकीट काढून
सर्कसला पुढच्या शीटवर बसले.सर्कस चालू
झाली,बाईसाहेबांनी डोळयावर गॉगल घातला होता. आणि तोच
प्रयोग सुरु झाला बाइने हत्ती उचलेला पाहून
साहेबांनी टाळी वाजवली.
अशा पध्दतीने खेळ पूर्ण झाल्यानंतर
साहेबांनी मॅनेजरची भेट घेतली व बाईसाहेबांचे अभिनंदन
करायच ठरवलं. मॅनेजर साहेबांना घेवून साहेबांकडे गेला परंतु
बाईसाहेबांनी डोळयावर गॉगल घातल्यामुळे
साहेबांनी तीला ओळखले नाही.साहेबांनी अभिनंदन केलं
असता बाईसाहेब नेहमीप्रमाणे म्हटल्या,त्यात काय अवघड
केलं म्हणजे होतं.हे ऐकल्याबरोबर साहेब म्हटले
आमची ही बी असंच म्हणायची आणि तेवढण्यात
बाईसाहेबांनी गॉगल काढला व म्हटले,अरे तु होय.मग
ही खरी वस्तुस्थिती एकमेकांना कळली व
दोघांनी एकमकांची माफी मागितली.
सिध्दांत - केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहीजे.प्रयत्नाने
अशक्य गोष्टी ही साध्य होता.म्हणून प्रयत्नच सर्वश्रेष्ठ
आहे.
प्रमाण - १} असाध्य ते साध्य करिता सायास । कारण
                  अभ्यास तुका म्हणे ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा