शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

श्री क्षेत्र नारायण गड येथील कार्तिकी यात्रेला एकादशी पासून सुरुवात झालेली आहे






श्री क्षेत्र नारायण गड येथील कार्तिकी यात्रेला एकादशी पासून सुरुवात झालेली आहे . दर वर्षी कार्तिक शु. १५ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते ती त्रिपुरारी पोर्णिमा असते त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध केला. त्या निमीत्ताने आनंद उत्सव म्हणून हि यात्रा भरते पुढे आठ दिवस सुरु असते. गडावरील उत्सावामध्ये हा यात्रेचा उत्सव सर्वात मोठा असतो . यात्रेच्या निमित्ताने गडावर विविध उपक्रम राबवले जातात.खाण्याच्या पदार्थाचे , इतर वस्तूचे , लहान मुलाच्या मनोरंजनाच्या दुकानांची रेलचेल असते . हि यात्रा दिवाळीच्या सुट्टीत असल्याने लहान मुलासहीत मोठेही मंडळी यात्रेचा आनंद लुटतात .या यात्रेच्या निमित्ताने गडावर रक्तदान शिबिराचे आयोजन न चुकता केले जाते. या उपक्रमात आतापर्यंत हजारो लोकांनी सहभागी होऊन रक्तदान केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा