गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

नाम रुपा नाही मेळ । अवघा वाचेचा गोंधळ ॥

एक मतीमंद माणून फिरत फिरत एका गांवात
आला.त्याला आपण कोठे आहे,कोणत्या गांवात आहे हे
काहीही कळत नव्हते त्यामुळे तो त्या गांवातच फिरत
राहला.त्याला भूक लागली म्हणून
तो अन्नासाठी मागणी करता करता एका शेठजीच्या दारात
गेला व मला भूक लागली आहे जेवण द्या म्हणून
विनंती केली.ठीक आहे,त्याला शेठजीने जेवण दिले व येथेच
कामाला राहण्यास सांगीतले.तोही हो म्हणून
त्या ठिकाणी कामाला राहीला.
त्याला शेठजी घोडयाच्या तबेल्यामध्ये घेऊन गेला व
हया प्राण्यांची देखभाल करण्याचे काम
सोपवले.खरारा करणे,पाणी पाजणे,तबेला साफ
ठेवणे,इत्यादी कामे त्याला शेठजीने
सांगतली.त्या माणसाला शेठजीने
घोडयाला पाणी पाजण्यासाठी सोडून दिला.त्याला नदीवर
पाणी पाजून आणण्यास सांगीतले.तो घोडा घेऊन नदीवर
गेला,त्याला पाणी दाखवल पण तहान नसल्याने
तो काही पाणी पीत नव्हता. त्याला असे वाटले की तोंडातील
वस्तूमुळे तो पाणी पीत नसेल म्हणून त्यांने घोडयाचे तोंडातील
वस्तु काढली.इतक्यात त्याने धूम ठोकली पळू
लागला.घोडा पुढे माणूस मागे घोडा रेसचा असल्याने तो दुर
निघून गेला.त्याला त्या प्राण्याचे नांव माहीत नाही,ज्याचेकडे
काम करता होता त्या शेठजीचे नांव माहित नाही तसेच हातात
काय वस्तू आहे हेही काहीच माहित नसल्याने
तो घोडयाच्या तोंडातील वस्तु पुढे करुन समोरुन येणा-
या व्यक्तीला सांगू लागला की,अहो रांव तुम्ही,ज्यांच्याकडे
होतो आम्ही,त्यांना जाऊन सांगा तुम्ही (लगाम हातात धरुन)
हयाच्यातलं जे होत ते गेलं म्हणावं. मग
सांगा समोरच्या माणसाला काही समजेल कां.
सिध्दांत - तत्वत: देवाचे नांवही माहित
नाही आणि रुपही माहिती नाही असा जर परमार्थ करत असेल
तर त्याचा आयुष्यात मेळ केंव्हाच लागणार नाही.
प्रमाण - १}
नाम रुपा नाही मेळ । अवघा वाचेचा गोंधळ ॥
............. तुकाराम महाराज


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा