शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

लाल हिरे का गठरी बार बार मत खोल । जब आयेगा उसका पारखी तो वो ही करेगा मोल ॥ संत कबीर
























मेंढपाळाला सापडलेल्या हि-याचे मुल्य
एक धनगर आपल्या मेंढ्या पाळण्याचे काम करत
असता एक दिवस मेंढ्या घेऊन जात असताना एक
चकमणारी वस्तू त्याला दिसली ती त्यांने घेतली ती फार
आवडल्याने त्याने ती घेतली व कळपातील
आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधली.तो वारंवार त्या मेंढी व
त्या चमकणा-या वस्तूकडे पाहून खुश व्हायचा.पण तीचे
महत्व त्याला कळले नाही.एक दिवस रस्त्याने जाणा-
या व्यापा-याने त्या कळपातील मेंढीच्या गळ्यातील
चमकणारा हिरा पाहीला व मनात म्हणाला की, हया बिचा-
याला हयाची किंमत कळलेले दिसत नाही म्हणून त्याने
ती मेंढीच्या गळ्यात लटकवलेली दिसते.व्यापा-याने
मेंढपाळला भेटून ती मेंढी विकत घेण्याची विनंती केली.परंतु
त्या मेंढपाळाची ती मेंढी आवडती असल्याने त्याने
विकण्यास नकार केला.असे बराच वेळ व्यवहार
चालला,मेंढपाळ त्याची आवडती मेंढी असल्याने ती तो देणार
नाही हे लक्षात आल्यावर त्याने हि-याची विकत देण्याबाबत
विचारले;तेंव्हा मेंढपाळाला कळले की व्यापा-
याला ही चमकणारी वस्तू हवी आहे.या वस्तूचीही किंमत
निश्चीत फार असणार हे लक्षात आल्यावर तो व्यापा-
याला म्हणाला बोला तुम्ही किती किंमत देणार?धनगर
बिचारा साधा भोळा असल्याने त्याला त्याने बाजारात जावून
किंमत काढण्यास सांगीतले.त्याचे बाजारात जाऊन
त्या वस्तूची किंमत काढली तेंव्हा त्याला कोणी एक लाख
कोणी दीड लाख कोणी दोन लाख असे सांगीतले तेंव्हा ती वस्तू
सामान्य नसून तो हिरा आहे व त्याची किंमत लाखाच्या पटीत
असल्याचे त्याचे त्याला कळून आले.
सिध्दांत: धनगराला खरा हिरा सापडला परंतु त्याचे मुल्य
त्याला कळले नाही.हे जरी सत्य आहे.तसेच
आपणा सर्वांना जो नरदेह मिळाला त्याची किंमत कळते का?
तर नाही.तर नरदेहाचे महत्व संत सद्गुरु भेटल्यानंतरच कळेल.
प्रमाण - १} लाल हिरे का गठरी बार बार मत खोल । जब
आयेगा उसका पारखी तो वो ही करेगा मोल ॥ संत कबीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा