गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

जिथे चावला तिथे लाव




 जिथे चावला तिथे लाव
एक म्हातारी होती, तिला एक मुलगा होता व
तो थोडा भोळसट होता. तो मोठा झाल्यावर म्हातारीने त्याचे
लग्न केले. संसार करु लागले, शेतकरी कुटुंबातील असल्याने
असेच एक दिवस सासू त्या सुनेला आपली गाय गोठयात
बांधायला सागते. तेंव्हा ती सुन गाय बांधण्यासाठी गोठयात
खुंटीजवळ जाते. त्या खुंटीजवळ विंचू असल्याने
तो सुनेला चावला. ती मोठमोठयाने आरडाओरडा करुन सांगू
लागली मला विंचू चावला. तीचा मालक तातडीने डॉक्टरांकडे
जावून औषध घेऊन आला. डॉक्टरांनी सांगतल्या प्रमाणे जीथे
चावला तिथे औषध लावावयास सांगीतले असता ते दोघे
ज्या ठिकाणी विंचू होता त्या ठिकाणीते औषध लावू लागले.
सांगा पाव्हुन आता तीच्या वेदना केंव्हा कमी होतील । आपले
पण असेच चालले आहे.
सिध्दांत - वास्तविक साधुसंत सांगतात एक व
आम्ही समजतो भलतेच. साधू संताने बरोबर सांगितले आहे.
पण संताना जे सांगावयाच ते आम्हाला समजतच
नाही आणि म्हणून कदाचित साधन बरोबर असून
सुध्दा आम्हाला त्याचा फायदा होत नाही किवा साधन
मिळूनही अशा पध्दतीने ते वायाच जात आहे. म्हणून संताचे जे
मनोगत आहे ते बरोबर आत्मसात झाले पाहीजे त्यात
थोडी सुध्दा कमतरता उपयोगाची नाही. औषध मिळनही जर
वापर कळाला नाही तर औषध प्राप्त होऊन उपयोग नाही.
प्रमाण - १} तैसे तोंडी ब्रह्मनाम । हाती ते सात्वीक कर्म ।
विनियोगेविण काम । विफळ होय ॥ ज्ञानेश्वरी ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा